वृत्तसंस्था/माद्रिद
सीमालढ्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे नेते तसेच माजी खासदार बॅरिस्टर नाथ पै यांचे ज्येष्ठ पुत्र आनंद पै यांचे 20 ऑगस्ट रोजी स्पेनमध्ये निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. आनंद पै यांचा मुंबई येथे जुलै 1961 मध्ये जन्म झाला होता. बॅरिस्टर नाथ पै यांचे जानेवारी 1971 मध्ये निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी क्रिस्टल यांनी पुत्र दिलीप तसेच आनंद यांच्यासोबत व्हिएन्ना येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी आनंद हे 10 वर्षांचे होते. आनंद पै हे अलिकडेच आयटी क्षेत्रातील नोकरीतून निवृत्त झाले होते. आनंद पै यांच्यामागे परिवारात जोडीदार मारिया आणि धाकटे बंधू दिलीप असून ते ऑस्ट्रिया येथे वास्तव्यास आहेत. तर बॅरिस्टर नाथ पै यांच्या पत्नी क्रिस्टल यांचे जुलै 2018 मध्ये निधन झाले होते.









