पाईपलाईन दुऊस्त करून अखेर गल्लीला पाणी सोडल्याने समाधान
वार्ताहर /अगसगे
अगसगे येथील आंबेडकर गल्लीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याने याबाबत तऊण भारतमधून वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाणी समस्येचे त्वरित निवारण करावे अशी सूचना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना केली होती. त्याची दखल घेऊन पाईपलाईन दुऊस्त करून अखेर गल्लीला पिण्याचे पाणी पुरविले. त्यामुळे ग्रामस्थांतून ‘तऊण भारत’चे कौतुक होत आहे. ऐन पावसाळ्यात आंबेडकर गल्लीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. आठवड्यातून एकदा गावच्या वेशीजवळील कूपनलिकेचे पाणी सोडत होते तेही बेळगाव अगसगे मुख्य रस्त्यावरून महिला व लहान मुलांना आणावे लागत होते.
त्यामुळे त्यांना नाहक त्रास सोसावा लागत होता. गेल्या दोन महिन्यापासून जलजीवन मिशन अंतर्गत येणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. कारण पावसामुळे पाणी गढूळ येत असल्याने अधिकाऱ्यांनी पाणी सोडलेच नाही. त्यामुळे आंबेडकर गल्लीतील नागरिकांना भटकंती करावी लागली. याकडे ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकाऱ्यांनी फिरवून देखील पाहिले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यापासून गैरसोय झाली. ग्रामपंचायत सदस्य व पीडीओ एन. ए. मुजावर यांना वारंवार कळवून देखील ते याकडे दुर्लक्ष करत होते. ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी त्यांची येथून अन्यत्र बदली करावी असे निवेदन देखील जिल्हा पंचायतीकडे केले आहे.
‘तरुण भारत’ वृत्ताची दखल
आंबेडकर गल्ली येथे ऐन पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत होती. त्याकडे कोणी लक्ष देतील काय आणि पिण्याचे पाणी देता का असे वृत्त दि. 9 रोजी तरुण भारतमधून प्रसिद्ध होताच तालुका महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी महांतेश शेवटगुंडी यांनी गावाला भेट देऊन आंबेडकर गल्लीतील पाणी समस्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी जयभीम युवक मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा मैत्री सेफ वर्ड समूहाचे अध्यक्ष दलित नेते अर्जुन कांबळे, सन्नाप्पा कोलकार, हनुमंत कोलकार, प्रकाश मुतगेकर यांच्याशी चर्चा केली व पीडीओ गैरहजर असल्याकारणाने सेक्रेटरी पुंडलिक कुरबेट यांना आंबेडकर गल्लीमध्ये बोलावून पाणी समस्येचे त्वरित निवारण करावे अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हा पंचायतकडे तक्रार दाखल करतो असे महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी पुंडलिक चिवटगुंडी यांनी सांगताच खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लागलीच पाईपलाईन दुऊस्त करून गल्लीला पिण्याचे पाणी सोडले. यामुळे नागरिकांनी तरुण भारतचे आणि महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी महांतेश चिमटगुंडी यांचे आभार मानले.









