बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व तात्यासाहेब मुसळे स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय हँडबॉल स्पर्धेत मुलांच्या विभागात संत मीरा संघाने जी. जी चिटणीस संघाचा तर मुलींच्या विभागात बालिका आदर्श संघाने संत मीरा संघाचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून विजेतेपद पटकाविले. के.एल.एस. स्कूलच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत मुला-मुलींच्या 15 संघाने भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन केएलएस स्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका नाईक, व अनुराधा जाधव यांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून करण्यात आली. या स्पर्धेत मुलांच्या विभागात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संत मीरा संघाने बनशंकरी तात्यासाहेब मुसळे संघाचा 12-3 अशा गोल फरकाने तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जी.जी चिटणीस संघाने केएलएस संघाचा 5-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात संत मीरा संघाने जी.जी चिटणीस संघाचा अटीतटीच्या लढतीत 6-5 असा निसटता पराभव करून विजेते पद पटकाविले. मुलींच्या विभागात खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संत मीरा संघाने गोमटेश संघाचा 7-3 असा पराभव तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बालिका आदर्श संघाने केएलएस संघाचा 8-1 पराभव करून अंतिम करीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात बालिका आदर्श संघाने संत मीराचा 8-5 अशा गोल फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून जयसिंग धनाजी, उमेश मजुकर, उमेश बेळगुंदकर, देवेंद्र कुडची, व विवेक यांनी काम पाहिले. यावेळी टिळकवाडी विभागातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









