सावंतवाडी : प्रतिनिधी
मोती तलावात सोमवारी आत्महत्या केलेल्या शहरातील तरुण व्यापारी राकेश नेवगी (४२) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला.पालिका कर्मचाऱ्यांनी हा मृतदेह बाहेर काढला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राकेश नेवगी यांनी सोमवारी मोती तलावात उडी टाकून आत्महत्या केली होती. काल दिवसभर मृतदेहाचा शोध घेण्यात आला. परंतु तो सापडला नाही. मंगळवारी सकाळी आठ वाजता तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना मृतदेह तरंगताना आढळला. तो बाहेर काढण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Previous Articleपिडीतेवर झाला नृशंस लैंगिक अत्याचार
Next Article टेटे स्पर्धेत केएलएस विजेता, डीपीला दुहेरी मुकुट









