चेन्नई
भारतीय सैन्याचे माजी प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचे सोमवारी निधन झाले आहे. त्यांनी चेन्नईमध्ये वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. जनरल सुंदरराजन यांचा जन्म 5 डिसेंबर 1940 रोजी केरळच्या त्रिवेंद्रममध्ये झाला होता. राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज (आरआयएमसी) देहरादून आणि एनडीएचे ते विद्यार्थी राहिले होते. 30 सप्टेंबर 2000 साली त्यांनी 20 वे सैन्यप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 31 डिसेंबर 2002 रोजी ते निवृत्त झाले होते.