उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती; रत्नागिरीत संरक्षणविषयक साहित्याचे प्रदर्शन, कार्यशाळा
रत्नागिरी प्रतिनिधी
संरक्षणविषयक क्षेत्रातील नामांकित निबे कंपनी रत्नागिरीत लवकरच लष्करी साहित्याची निर्मिती करणार आह़े या संबंधी उद्योग विभाग व निबे कंपनी यांच्यातील सामंजस्य करार मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यागृह येथे रविवारी पार पडल़ा निबे कंपनी रत्नागिरीत 1 हजार कोटी ऊपयांची गुंतवणूक करणार आह़े यातून सुमारे दीड हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल़ी.
उद्योग विभाग याच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यागृह येथे संरक्षणविषयक साहित्याचे प्रदर्शन व कार्यशाळेचे रविवारी आयोजन करण्यात आले होत़े याचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, निवृत्त व्हाईस अॅडमिरल सुनील भोकरे, निबे कंपनीचे किशोर धारिया, बाळकृष्ण स्वामी, भावेश निबे, प्रकाश भामरे, निवृत्त कमांडर सौरभ देव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्रासाठी आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. देशाच्या संरक्षणासाठी काय केले पाहिजे, हे सांगणारा आजचा कार्यक्रम आहे. बंदूक हातात घेऊन सीमेवर राहूनच देशसेवा करता येते असे नाही, संरक्षण क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यातूनही देशाच्या संरक्षणाचे धडे मिळतात. हजारो नोकऱ्या मिळू शकतात, त्यातून देशसेवा घडू शकते. सैनिकांचा आदर सर्वांना असला पाहिजे. ते देशाच्या सीमेवर रक्षण करतात, म्हणून आपण शांतपणे झोपू शकतो, ही भावना सर्वांनी ठेवायला हवी. माजी सैनिकांचे देशाप्रती असणारे योगदान विसरून चालणार नाही, असे कार्यक्रम प्रत्येक जिह्यात व्हायला हवेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचे हेलिकॉप्टर नाशिकला तयार होते. रस विक्री करणारे निबेंनी डिफेन्सचे महाराष्ट्राचे नाव जगावर नेले आहे. जी बंदूक परदेशातून 2 लाख 37 हजार रूपयांना आयात करायला लागायची, ती बंदूक निबेंनी मेक इन इंडियामध्ये केवळ 37 हजार ऊपयांमध्ये तयार केली. अशा क्षेत्रात रत्नागिरीकरांनी सहभागी झाले पाहिजे. जिह्यात राहूनच अशी प्रगती विशेषत: तऊणांनी करायला हवी. अजूनही एक फार मोठा डिफेन्सशी निगडित प्रकल्प रत्नागिरीत येत आहे. 10 हजार नोकऱ्या द्यायच्या आहेत. जिह्यातील युवकांनी मुंबईला न जाता जिह्यातील अशा प्रकल्पात सामील व्हावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
पोलीस भरतीमध्ये होमगार्डमधील 5 टक्के जागा असतात. पण, आपली मुले होमगार्ड व्हायला लाजतात. स्थानिकांनी याचा विचार करावा. स्थानिक मुलांनी पोलीस दलात भरती होण्यासाठी त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी डिपीडीसीमधून निधी दिला जाईल. त्याचे नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना केली. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, विद्यार्थ्यांने आपल्या जीवनात आर्मीची शिस्त ठेवावी. कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर करताना मेहनत जऊर ठेवावी. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी कोकणामध्ये मुलांच्यात गुणवत्ता चांगली आहे. मुंबईला जाण्यापेक्षा पोलीस विभाग, संरक्षण क्षेत्राशी निगडित क्षेत्रामध्ये करिअर करावे, असे आवाहन केल़े कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांनी तर सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी केले.