सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील तरूणाने सोमवारी सकाळी नऊ वाजता मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. नागरिकांना ही घटना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तलावाकाठी सर्व पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तसेच युवकाच्या नातेवाईकांनी धाव घेतली होती. हा तरुण शहरातील व्यापारी आहे. तलावाकाठी एक दुचाकी आढळली असून पोलीस खात्री करत आहेत.









