कोवाड वार्ताहर घुल्लेवाडी (ता.चंदगड) येथील मराठा लाईट एन्फ्ंट्री बेळगावचे हवालदार सुनील वसंत सलाम (वय 37 ) यांचे आज शनीवारी सकाळी दहा वाजता सेवा बजावत असताना बेळगांव येथे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
आतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते देशसेवेसाठी लष्करामध्ये भरती झाले होते. एक उमदा युवक देशसेवा बजावत असताना अचानक काळाने घाला घातला. त्यांच्या आकस्मिक निधन झाल्याची बातमी गावाकडे समजताच घुल्लेवाडी गावांसह पंचक्रोशीत हळहळली आहे. हवालदार सलाम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
शासकिय इतमामात त्यांच्या पार्थिवावर आज शनीवार दि.१७ रोजी घुल्लेवाडी येथे दुपारी तिन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








