मुंबई :
अदानी समुहातील कंपनी एसीसी सिमेंटच्या नफ्यामध्ये 20 टक्क्यांची घसरण जून तिमाहीत दिसून आली. जून तिमाहीत कंपनीने 361 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफ्यापायी कमविले आहेत. याच तिमाहीमध्ये कंपनीने 5 हजार 154 कोटी रुपयांचा एकत्रित महसुल कमविला आहे. महसुलात मात्र तिमाहीमध्ये 9 टक्के घसरण पहायला मिळाली. खरं पाहता या तिमाहीत सिमेंटची विक्री 9 टक्के वाढत 10.2 दशलक्ष टनावर पोहोचली होती. तरीही महसुलात कामगिरी खालावली. गेल्या पाच वर्षांमध्ये पहायला गेल्यास जून तिमाहीतील विक्री सर्वाधिक होती. गेल्या काही महिन्यांमध्ये सिमेंटच्या किंमती कमी झालेल्या आहेत. जून तिमाहीत कंपनीचा खर्च 2 टक्के वाढत 4 हजार 741 कोटींवर पोहोचला आहे.









