प्रत्युत्तरादाखल चकमकीत तस्करही ठार, मालदा जिल्ह्यातील सीमेजवळ घटना
► वृत्तसंस्था/ कोलकाता
बांगलादेशात सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सीमेवर हाय अलर्ट असताना पश्चिम बंगालच्या मालदा जिह्यातील भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ रविवारी मध्यरात्री बीएसएफने प्रत्युत्तर देत एका बांगलादेशी तस्कराला चकमकीत ठार केले.
बांगलादेशी तस्करांच्या एका गटाने सेवेवर असलेल्या बीएसएफ सैनिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून तस्करी करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी तस्करांचे मनसुबे उधळून लावले, असे बीएसएफने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बीएसएफ जवानाने स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिल्यानंतर अन्य तस्कर मायदेशी परतून गेले. मात्र, एका बांगलादेशी तस्कराचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. घटनास्थळावरून एक धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. ही घटना बीएसएफच्या दक्षिण बंगाल फ्रंटियर अंतर्गत 115 व्या बटालियनची सीमा चौकी असलेल्या चांदनीचक भागात घडली.
इतरत्रही हल्ले करण्याचा प्रयत्न
भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नाची ही एक वेगळी घटना नाही. गेल्या 24 तासात मुर्शिदाबाद आणि मालदा जिह्यातील नटाना फॉरवर्ड, कहारपारा आणि अनुराधापुरा या सीमा चौक्मयांव्यतिरिक्त उत्तर 24 परगणा आणि नादिया जिह्यातील घोजडांगा आणि महेंद्र या सीमा चौक्मयांवर बीएसएफच्या जवानांवर गोवंश तस्कर आणि अवैध घुसखोरांनी अशा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र, जवानांनी प्रत्युत्तर देत तस्करी आणि घुसखोरीच्या घटना हाणून पाडल्या.









