वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागच्या सलगच्या तिमाहीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने दमदार प्रदर्शन केलेले आहे. भारत सर्व आघाडींवर उत्तमपणे कार्यरत आहे. हे प्रदर्शन येणाऱ्या भविष्य काळातही चांगले राहू शकते, अशा प्रकारचा विश्वास जागतिक रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबल यांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण आशियामधील देशांमध्ये पाहता भारताचा विकास उत्तम पद्धतीने दिसून आला आहे. अमेरिकेतील रेटिंग एजन्सीच्या मते देशातील महागाई व वित्तीय तूट कशी काय असणार आहे यावरून देशाच्या पुढील विकासाची दिशा ठरणार आहे. सद्यस्थितीतील भारताची आर्थिकसह इतर क्षेत्रातील वाटचाल सर्वच आघाड्यावर उत्तमपणे चाललेली आहे, असे रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.









