बेटावर केवळ 6 लोकांचे वास्तव्य
जगात एक असे बेट आहे, जे मांजरांनी भरलेले आहे. जपानचे आओशिमा बेट मांजरांचे बेट म्हणूनही ओळखले जाते. प्रत्यक्षात येथे माणसांपेक्षा मांजरांची संख्या अधिक आहे. एहिमे प्रांताच्या किनाऱ्यापासून दूर असलेले बेट 120 हून अधिक स्वतंत्र स्वरुपात फिरणाऱ्या मांजरांचे घर आहे. 2000 च्या दशकापूर्वी आओशिमा एकाकी ठिकाण होते, तेथे सुमारे 20 लोकच राहत होते. तर इंटरनेटच्या युगात आओशिमाविषयी बरेच काही प्रसिद्ध झाल्यापासून बेटावर पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जगभरातील मांजरप्रेमी येथे येत असतात. मांजरांना पसंत करणारे लोक जपानच्या आओशिमा बेटावर येत असतात.

कमी लोकसंख्या असूनही आओशिमामध्ये मांजरांचे राज्य आहे. येथे प्रत्येक एका माणसामागे 6 मांजरं आहेत. कॅट आयलँडवर अनेक पर्यटक येतात. या बेटावर केवळ 6 जण अद्याप या बेटावर स्थायी स्वरुपात राहतात. एकेकाळी हे बेट एक समृद्ध मच्छिमारांचे गाव होते. 1940 च्या दशकाच्या मध्यात सुमारे 900 लोक या बेटावर राहत होते.
नव्या आकडेवारीनुसार बेटावरील मांजरांची संख्या सुमारे 200 इतकी आहे. आओशिमामध्ये मांजरांची संख्या वाढण्यापूर्वी बेटावर उंदरांची मोठी समस्या होती. गावातील लोक मासेमारीच्या जाळ्यासाठी रेशीम निर्माण करण्यासाठी रेशीमच्या किड्यांचे पालन करायचे. रेशीमचे किडे उंदरांना आकर्षित करतात, यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मांजरांना आणले गेले. मांजरांनी स्थानिक उंदरांची संख्या संपविली. आता आओशिमा बेटावर लोकांना उंदरांचा कुठलाही त्रास नाही.
आओशिमामध्ये प्रतिदिन केवळ 34 पर्यटकांनाच येण्याची अनुमती आहे. हा निर्णय पर्यटकांची निराशा करणारा असला तरीही बेटावरील वृद्ध रहिवाशांसाठी तो महत्त्वपूर्ण आहे, अन्यथा पर्यटन वाढल्यास त्यांना त्रास होऊ शकतो. येथे येणारे पर्यटक मांजरांसाठी खाद्य आणू शकतात. याचबरोबर त्यांच्यासाठी जपानचे लोक देणगीद्वरो मांजरांसाठी भोजनाच्या व्यवस्थेत योगदान देतात. याचबरोबर मांजरांना सागराच्या माशांद्वारेही भोजन मिळते. काही वर्षांपासून मांजरांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना देखील हाती घेण्यात आली आहे.









