नेहरूनगर येथील प्रकाराने रहिवाशांतून संताप
बेळगाव : नेहरूनगर येथील डी-मार्ट समोर गटारीमध्येच विद्युत खांब टाकण्यात आला आहे. यामुळे साफसफाई करताना कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. पावसाच्या दिवसात विद्युत खांबाकडे कचरा साचत असल्याने गटारीतील पाणी रस्त्यावरून वाहत आहे. खराब झालेला विद्युत खांब काढल्यानंतर तो घेऊन जाण्याऐवजी गटारीत टाकण्याचा प्रकार नेहरूनगर येथे घडला आहे. विद्युत खांब टाकल्यामुळे गटारीतील सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळे येत आहेत. सर्व कचरा तसेच माती येऊन या ठिकाणी साचली असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहात आहे.त्यामुळे हेस्कॉमने गटारीतील विद्युत खांब हटवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









