कबड्डी या क्रीडा प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सप्टेंबर महिन्यात भारतात महिलांची पहिली कबड्डी लीग स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये 15 देशांचे स्पर्धक एकत्रित येतील.
महिलांच्या या पहिल्या कबड्डी लीग स्पर्धेचे नामकरण प्रवासी महिलांची कबड्डी लीग स्पर्धा अशी करण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कबड्डी या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हे पहिला पाऊल उचलण्यात आले आहे. 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धा यजमान पदासाठी भारत प्रमुख दावेदार आहे त्यामुळे कबड्डीचा या आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विश्व कबड्डी संघटनेच्या सहकार्याने तसेच होलीस्टिक आंतरराष्ट्रीय प्रवासी स्पोर्ट्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची ही कबड्डी लीग स्पर्धा घेतली जाणार आहे.
या आगामी स्पर्धेमध्ये इंग्लंड, पोलंड, अर्जेंटिना, कॅनडा आणि इटलीच्या कबड्डीपटूंनी सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आहे. भारतामध्ये कबड्डीहा क्रीडा क्षेत्रातील खूप जुना क्रीडा प्रकार म्हणून ओळखला जातो. 1990 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा कब•ाrचा समावेश करण्यात आला होता. तर 2010 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांची कबड्डी स्पर्धा पहिल्यांदा घेण्यात आली होती. भारताचे क्रीडा मंत्री किरेण रिजिजू यांनी कबड्डी या क्रीडा प्रकाराचा 2036 च्या भारतात होणाऱ्या संभाव्य ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. महिलांच्या पहिल्या कबड्डी लीग स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.









