जपानची अॅमी युआसा : ब्रेकिंगचे सुवर्ण
वृत्तसंस्था/ पॅरिस
महिलांच्या ब्रेकिंग या क्रीडा प्रकारात जपानची बी गर्ल अॅमीने (अॅमी युआसा) सुवर्णपदक पटकावले. 16 डान्सर्सच्या अंतिम फेरीत शानदार प्रदर्शन करीत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. लिथुआनियाच्या निकाने (डॉमिनिका बॅनेविच) रौप्य व चीनची बी गर्ल 671 (लियू किंगयी) ने कांस्यपदक पटकावले.
अॅमीने सर्व तीनही फेऱ्यांत निकावर मात केली. तिच्या कामगिरीने जमलेले प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते. तिची हेडस्पिन, विंडमिल्स, बॅकफ्लिप्सची कामगिरी पाहून सारेच चकित झाले. बाद फेरीत 17 पैकी आठ खेळाडूंना संधी मिळाली. कांस्य मिळविणाऱ्या चीनच्या लियू किंगयीला नेदरलँड्सच्या इंडिया सरजोने जोरदार लढत दिली. पेंगयीने ब्रेकिंगमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला होता.









