ओटवणे । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण अभियान अंतर्गत पारपोली, देवसु ओवळीये या तीन गावासाठी बांधण्यात आलेल्या देवसू येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरचे उद्घाटन गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०:५७ वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पारपोली, देवसु, ओवळीये या तीन गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ आदिती पाटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी या आरोग्य उपकेंद्रासाठी ६ गुंठे जमीन देणारे बाबू पायबा सावंत आणि प्रकाश अनंत सावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता स्वराभिषेक भक्ती सुमनांजली हा कार्यक्रम होणार आहे.