वृत्तसंस्था/पॅरिस
भारतीय पुरुष हॉकी संघातील बचावळ फेरीत खेळणारा अमित रोहिदास याच्यावर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या शिस्तपालन समितीने एक सामन्याची बंदी घातली आहे. या कारवाईमुळे अमित रोहिदासला जर्मनीबरोबर होणाऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्याला मुकावे लागणार आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमित रोहिदासकडून मैदानात शिस्तपालन नियामचा भंग झाल्याने त्याला पंचांनी लालकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. या प्रकरणाची सुनावणी तातडीने झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या संबंधित समितीकडून अमित रोहिदासवर एक सामन्याची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. ब्रिटन विरुद्धच्या सामन्यात अमित रोहिदासने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूवर हेतुस्पर हॉकी स्टिकने प्रहार केल्याने पंचांनी रोहिदासला लालकार्ड दाखवून या सामन्यातील 40 मिनीटे बाकी असताना मैदानाबाहेर काढले. आता जर्मनी विरुद्धच्या सामन्यात भारताचे 15 खेळाडू उपलब्ध राहतील.









