प्रतिनिधी/ बेळगाव
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. गोकाक व चिकोडी तालुक्यातील पूरपरिस्थितीची ते पाहणी करणार आहेत. सोमवारी दिवसभर मुख्यमंत्री जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांचा दौरा करणार आहेत.
सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास विशेष विमानाने सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. तेथून गोकाक तालुक्यातील पूरग्रस्त भाग व काळजी केंद्रांना भेटी देऊन ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर कागवाड तालुक्यातील जुगूळ, चिकोडी तालुक्यातील मांजरी पुलाची पाहणी करून सायंकाळी ते बेळगावला येणार असून 6.55 वा. विशेष विमानाने बेंगळूरला जाणार आहेत.









