मयुर चराटकर
बांदा
रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेला गुरुवारी रात्री उशिरा अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मधून रत्नागिरी येथे हलविले. तिची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने तिला सुरुवातीला सावंतवाडी येथून ओरोस येथे तेथून गोवा बांबोळी येथे हलविले होते. मात्र तेथे उपचार केल्यावर तिला परत बुधवारी रात्री सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी रात्री तिला परत अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविले. अद्याप सदर प्रकरणाचा छडा लागला नसून तिची मानसिक स्थिती स्थिर झाल्यावर पोलिस मुळाशी पोहचतील असे बोलले जात आहे.









