वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बुधवारी महिलांच्या ट्रायथ्लॉन या क्रीडा प्रकारात फ्रान्सच्या कॅसान्ड्रे ब्यूग्रँडने सुवर्णपदक पटकाविले. टॉपसिडेड बॉग्रेंडने आपले नजीकचे प्रतिनिधी स्वीसच्या डेरॉन आणि ब्रिटनच्या पॉटेर यांना मागे टाकले.
महिलांच्या ट्रायथ्लॉनमध्ये ब्यूग्रँडने दर्जेदार कामगिरी करत फ्रान्सला सुवर्णपदक मिळवून देण्याचा विक्रम केला आहे. या क्रीडा प्रकारात स्वीसच्या ज्युली डेरॉनने रौप्य पदक तर ब्रिटनच्या बेथ पॉटेरने कास्यपदक पटकाविले. सीन नदी प्रदूषित असल्यामुळे हा क्रीडा प्रकार लांबणीवर टाकण्यात आला होता. महिलांच्या ट्रायथ्लॉनमध्ये ब्यूग्रँड आणि क्वीसच्या डेरॉन यांच्यातच कडवी चुरस पहावयास मिळाली.