कच्चे मांस खाण्याची सवय
जगभरात असे अनेक समुदाय आहेत, जे स्वत:च्या विचित्र परंपरांमुळे ओळखले जातात. असाच एक समुदाय असून त्याचे लोक गाजराप्रमाणे कच्चे मांस चावून खात असतात. या समुदायाचे नाव हद्जावे असून तो टांझानियात वास्तव्याला आहे. या समुदायाला शिकारी समुदाय म्हणून ओळखले जाते. या समुदायाचे लोक प्राण्यांची शिकार करून त्याचे कच्चे मांस चावून खात असतात. याचबरोबर या समुदायातील लोक परस्परांशी बोलत नाहीत, तर शिटीसारखा आवाज काढून संवाद करतात.
या समुदायाच्या लोकांना बोलणे येत नाही आणि जंगलात राहत असल्याने अक्षरओळख देखील नाही. या समुदायाच्या लोकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हद्जा समुदायाचा एक इसम कच्च्या मांसाचा तुकडा स्वत:च्या हातात घेऊन अत्यंत आरामात तो खात असल्याचे दिसून येते.
तसेच संबंधित इसम मांसातून सांडणारे रक्तही शोषून घेत असल्याचे यात दिसून येत. सोशल मीडियावर आफ्रीकन ट्राइब कल्चर नावाच्या अकौंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 4 कोटी 32 लाखाहून अधिक ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. तर 4 लाख 63 हजारांहून अधिक जणांनी याला लाइक केले आहे. तर यावर 17 हजारांहून अधिक कॉमेंट्स प्राप्त झाल्या आहेत. लाखो लोकांनी या व्हिडिओला शेअर केले आहे.
या समुदायाच्या लोकांची अद्याप आधुनिक जगताशी ओळख झालेली नाही. याचमुळे ते आदिमानवांप्रमाणे राहत असल्याचे मानले जात आहे. परंतु आता कालौघात या समुदायाशी अन्य लोकांचा संपर्क येऊ लागला आहे. यामुळे या समुदायाच्या लोकांच्या राहणीमानात बदल होण्याची शक्यता वाढली आहे. पिढ्यानपिढ्या या समुदायाचे लोक कच्चे मांस खात असल्याने त्यांना याची सवय लागून गेली आहे.