सांगली शहर पोलीसांच्याकडून तपास सुरू
सांगली प्रतिनिधी
शहरातील कर्नाळ चौकी येथे ट्रक व्यवहरातील खरेदी-विक्रीच्या वादातून चौघांनी चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी अक्षय राजाराम कदम रा. कोल्हापूर रोड रूक्मिणीनगर सांगली फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार सागर गावडे रा. सांगलीवाडी आणि त्याचे तीन अनोळखी मित्र याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अक्षय कदम हे ट्रक ड्रायव्हर आहेत. त्याचा आणि संशयित सागर गावडे यांच्यात ट्रक व्यवहारातील खरेदी-विक्रीतून वाद होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी 28 जुलै रोजी रात्री सव्वा दहा वाजता कर्नाळ चौकी जवळ कदम आणि गावडे आले होते. त्यावेळी कदम याचा मित्र दीपक सुतारही उपस्थित होता. या वादातून कदम याच्यावर गावडे आणि त्याच्या मित्रांने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी हा वाद सोडवण्यासाठी दीपक सुतार मध्ये पडल्यावर त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याच्यावर या चौघांनी चाकूने हल्ला करून त्याला जखमी पेले आहे. त्यानतंर कदम यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तात्काळ गावडे आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. सांगली शहर पोलीसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.