या डिसऑर्डरने तुम्हीही असू शकता पीडित
अनेक लोकांसाठी वस्तू फेकणे किंवा टाकणे अत्यंत अवघड काम असते. मग ते जुने कपडे, भांडी किंवा घरातील एखादे तुटलेले फर्निचर असु दे. लोक या गोष्टी भले घराच्या एका कोपऱ्यात ठेवतील, परंतु त्यांना टाकण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत. याचबरोबर निरुपयोगी गोष्टी राखण्यात त्यांना रुची असते. जर त्यांना एखादी गोष्ट चांगली वाटत असेल आणि ती निरुपयोगी असेल तरीही हे लोक ते स्वत:कडे ठेवणे पसंत करतात. अशाप्रकारची सवय असलेले लोक होर्डिंग डिसऑर्डरने पीडित असू शकतात.
होर्डिंग डिसऑर्डर म्हणजेच संग्रहण विकारामुळे संबंधित व्यक्ती घरात ठेवलेली कुठलीही जुनी गोष्ट फेकू इच्छित नाही. याचा प्रभाव हळूहळू व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही दिसू लागतो. होर्डिंग डिसऑर्डर असामान्य नाही. जवळपास 2-6 टक्के लोक याच्यामुळे पीडित आहेत. 20 पैकी 1 व्यक्तीला होर्डिंग डिसऑर्डर असू शकतो. यात वय देखील एक महत्त्वाचा घटक ठरत असतो. 55 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये युवांच्या तुलनेत हा आजार निर्माण होण्याची शक्यता तीनपट अधिक असते. परंतु 20 वर्षांच्या वयापासून याची सुरुवात होऊ लागते, पण हा आजार 30 वर्षे किंवा त्यानंतर गंभीर होऊ लागतो.
होर्डिंग डिसऑर्डरची लक्षणे
गरज आणि गरजेच्या नसलेल्या दोन्ही प्रकारच्या वस्तू सोडण्यास असमर्थ होणे.
घर किंवा ऑफिसमध्ये गरजेपेक्षा अधिक सामग्री असणे
या सामग्रीदरम्यान गरजेची सामग्री शोधणे अवघड ठरणे.
एखाद्या दिवशी गरज भासेल असे मानून सामग्री न टाकणे
अनेक सामग्री स्वत:कडे बाळगणे कारण त्यामुळे एखादी घटना आठवणे
मोफत सामग्री किंवा अनावश्यक सामग्री गोळा करणे
सामग्री अधिक झाल्यास स्वत:ला असहाय्य मानू लागणे
अव्यवस्थेसाठी जागेच्या आकाराला जबाबदार ठरविणे
जागा कमी असल्याने काम करण्यास असमर्थ वाटणे
अत्याधिक अव्यवस्थेमुळे स्वकीयांसोबत भांडण होणे
होर्डिंग डिसऑर्डरवरील उपाय
होर्डिंग डिसऑर्डरचे निदान आणि उपचार शक्य आहे. परंतु होर्डिंग डिसऑर्डरने पीडित असलेल्या व्यक्तीला स्थिती ओळखण्यासाठी तयार करणे अवघड ठरू शकते. स्वकीय किंवा बाहेरील लोक याचे संकेत आणि लक्षणे ओळखू शकतात. होर्डिंग डिसऑर्डरच्या उपचारादरम्यान व्यक्ती विशेषावर लक्ष केंद्रीत असावे, अव्यवस्थेने युक्त जागांवर भर दिला जाऊ नये.