मनू भाकर,व सरबजोत सिंह या नेमबाजांच्या जोडीने भारताला १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकवून दिलं आहे. या जोडीने दक्षिण कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन यांचा १६-१० अशा मोठ्या फरकाने पराभव करत कांस्यपदक पटकावलं आहे. मनू भाकरचं हे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतल वैयक्तिक दुसरं पदक आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह मनू ही स्वतंत्र भारताला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं मिळवून देणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे.
मनूची ऐतिहासिक कामगिरी
मनू भाकेर ही ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती, तर आता तिने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी स्वतंत्र भारताची ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.









