वार्ताहर/हलशी
खानापूर तालुक्यातील हलशी येथील रामतीर्थ मंदिराची पूजा करण्यासाठी बेळगाव येथील राकेश नंदगडकर गेले होते. त्यांनी आपले चारचाकी वाहन मंदिराच्या बाजूला उभे करून रामतिर्थ येथील देवतांच्या पूजेसाठी गेले होते. काही अज्ञातांनी वाहनावर दगड टाकून काचा फोडल्या आहेत. त्यामुळे राकेश नंदगडकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. हलशीच्या पश्चिमेला डोंगरावर बाराव्या शतकात उभारलेले रामतिर्थ मंदिर आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक दर्शनासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनाला येतात. रामतिर्थापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने हलशी रामतिर्थ रस्त्यावर बांधलेल्या प्रवासी मंदिराजवळ वाहने उभी करून पर्यटक चालत रामतिर्थवर जातात. सोमवारी सकाळी बेळगावहून राकेश आपल्या कुटुंबियासह दर्शनासाठी आले होते. त्यांनी आपली कार क्र. केए 32-ए.न-6136 उभी करून रामतिर्थ दर्शनासाठी गेले होते.त्यावेळी ही तोडफोड केली. अद्याप याबाबत पोलिस स्थानकात गुन्हा नोंद नाही.









