प्रतिनिधी/ बेळगाव
दि सह्याद्री मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. बेळगाव, शहापूर शाखेच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन कार्यक्रम थाटात पार पडला. शहापूर शाखेला 25 वर्षे पूर्ण झाल्याने संचालक मंडळाने शहापूर शाखेला नूतन सभागृहाची भेट दिली. शहापूर शाखेचे अध्यक्ष व माजी चेअरमन बी. बी. सैनुचे यांनी फीत कापून सभागृहाचे उद्घाटन केले व शाखेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. सेव्रेटरी अनिल कणबरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
संस्थेचे चेअरमन आनंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ संचालक एन. बी. खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. माजी संचालक पुंडलिक उर्फ भाऊ मंडोळकर यांनी सहकार्याबद्दल आभार मानले. शहापूर शाखेत झालेल्या या कार्यक्रमास व्हाईस चेअरपर्सन सुजाता मायाण्णाचे, संचालक रघुनाथ बांडगी, पी. पी. बेळगावकर, एम. बी. निर्मळकर, विजय भोसले, संचालिका शीतल कोकीतकर, शहापूर शाखेचे उपाध्यक्ष सतीश खन्नुकर, सल्लागार प्रभाकर नाकाडी, बसवंत गडकरी, शाखा व्यवस्थापक भास्कर ताशिलदार, सर्व कर्मचारी, पिग्मी संकलक उपस्थित होते.









