अनंतनागमध्ये भीषण रस्ते दुर्घटना
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या एका रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये पाच मुलांचाही समावेश आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथील डाकसुम भागाजवळ वाहन उलटल्याने हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी क्रमांक जेके 03 एच 9017 असलेले सुमो वाहन जम्मू भागातील किश्तवाड येथून येत असताना ते डाकसुमजवळ रस्त्यावर उलटले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून त्यात 5 मुले, दोन महिला आणि एक पुऊष (पोलीस) यांचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.









