केरळ क्रीडामंत्री व्ही.अब्दुरहिमान
वृत्तसंस्था/ थिरुवनंतपुरम
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या राज्पातील प्रत्येक क्रीडापटूला प्रत्येकी 5 लाख देण्याची घोषणा केरळ सरकारने केली आहे.
केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमान यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. खेळाडूंव्यतिरिक्त अॅथलेटिक्सचे प्रमुख प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनाही पाच लाख मंजूर केले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मोहम्मद अनास, मोहम्मद अजमल (रिलेमधील धावपटू), अब्दुल्ला अबुबाकर (तिहेरी उडी), पीआर श्रीजेश (हॉकी), एचएस प्रणॉय (बॅडमिंटन) या केरळच्या खेळाडू प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सराव आणि खेळविषयक इतर खर्चासाठी त्यांना ही रक्कम देण्यात आली आहे. गेल्यावेळी कांस्यपदक मिळविलेल्या पुरुष हॉकी संघाकडून आम्हाला मोठ्या आशा आहेत तर बॅडमिंटनपटू प्रणॉयही चांगल्या फॉर्ममध्ये आहे,’ असेही ते म्हणाले. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.









