वार्ताहर/किणये
तालुक्यात डेंग्यूची साथ पसरली आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत ग्राम पंचायतींनी स्वच्छता मोहीम तसेच औषध फवारणीचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध ग्राम पंचायती पाण्याची स्वच्छता, गटारींची साफसफाई करू लागल्या आहेत. सावगाव परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. फॉगिंग मशिनद्वारे सावगाव येथील सर्व गटारी तसेच नागरिकांच्या परसामध्ये, साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी, जुन्या वस्तू ठेवलेल्या ठिकाणी औषध फवारणी करून पावडर टाकण्यात आली आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते फॉगिंग मशिनद्वारे औषध फवारणीचा शुभारंभ केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सर्व परिसरात औषध फवारणी व पावडर टाकली. बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीतर्फे ही मोहीम राबविली. सावगाव, गणेशपूर, बेनकनहळ्ळी, सरस्वती नगर, ज्योतीनगर, गंगानगर, क्रांतीनगर आदी परिसरात औषध फवारणी करण्यात आली. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहनही ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी केले आहे.









