वृत्तसंस्था/ कोलकाता
रविवारी येथे झालेल्या हॉकी इंडियाच्या पुरुष आणि महिलांच्या कनिष्ठ पूर्व विभागीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत ओडिशा आणि झारखंड यांनी अजिंक्यपदे मिळवली.
पुरुष विभागातील झालेल्या अंतिम सामन्यात ओडिशाने झारखंडचा 2-0 असा पराभव केला. तर महिलांच्या विभागातील अंतिम सामन्यात झारखंडने बंगालचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.









