जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून पंचगंगेच्या पातळीमध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. ३९ फूट इशारा पातळी असलेली पंचगंगा आता ३६.१ फूटावरून वाहत असून पावसाचा असाच जोर राहीला तर पंचगंगा नदी येत्या काही तासांध्येच इशारा पातळी गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार बॅटींग सुरु केली आहे. राधानगरी धरणासह पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला असून त्यामुळे धरण पाणलोट क्षेत्राती नद्यांच्या पाणीपातळी मध्ये वाढ झाली असून काही नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत.
पंचगंगा नदीच्याही पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ होऊन ती ३६ फूटांवरून वाहत आहे. येत्या काही तासांमध्य़े पावसाचा जोर असाच राहील तर पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन तर ३९ फूटावर असलेल्या इशारा पातळीवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून पूरबाधित क्षेत्रावर विषेश लक्ष ठेऊन आहे. दरम्यान, राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली असून ते आज सकाळपर्यंत ७३ टक्के भरले आहे. त्यामुळे प्रशासन