राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणि यांना परम विशिष्ट सेवा पदक (पीव्हीएसएम) प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या समारंभापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. या समारंभाला संरक्षण विभागाशी संबंधित विशेष निमंत्रित प्रामुख्याने उपस्थित होते.










