एकादशी दिवशीच घटना घडल्याने हळहळ
बेळगाव : आषाढीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेल्या सोनार गल्ली, वडगाव येथील एका वारकऱ्याचा हृदयाघाताने पंढरपुरात मृत्यू झाला आहे. आषाढी एकादशी दिवशीच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रवीण बळीराम सुतार (वय 39) रा. सोनार गल्ली, वडगाव असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. सोमवारी वडगाव येथील दहा भाविक विंगरमधून पंढरीला गेले होते. बुधवारी सकाळी आषाढीनिमित्त दर्शनाची तयारी सुरू असतानाच प्रवीणला हृदयाघात झाला. त्याला तातडीने इस्पितळात हलविताना त्याचा मृत्यू झाला.









