वार्ताहर /किणये
1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि इथला मराठी बहुभाषिक भाग अन्यायाने म्हैसूर राज्यात डांबला. याला विरोध करण्यात आला. अन् तेव्हापासूनच सीमा प्रश्नाचा लढा सुरू झाला. गेल्या 68 वर्षापासून सीमा बांधव विविध आंदोलने, मोर्चे या माध्यमातून महाराष्ट्रात जाण्यासाठी धडपडताना दिसत आहे. सध्या या लढ्यामध्ये चौथी पिढी सक्रीय झाली आहे. इतक्या वर्षाच हा लढा नक्कीच इतिहासाची साक्ष देणारा आहे. त्यामुळे सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी संघटित कार्य करण्याची गरज आहे, असे मनोगत अनिल गोजेकर यांनी जानेवाडी येथे व्यक्त केले. तालुका म. ए. समितीतर्फे गावसंपर्क अभियान बुधवारी सायंकाळी जानेवाडी, बहाद्दरवाडी गावात राबविण्यात आले.
याला कार्यकर्त्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जानेवाडी येथे समाज मंदिरात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जानेवाडीच्यावतीने गोजेकर बोलत होते. यावेळी मान्यवरांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. मल्लारी गोजेकर, मधु गुरव, नारायण होनगेकर, भैरू गुरव, नागेश पावशे, सातेरी पावशे, किरण पावशे, बाबू गुरव, मल्लाप्पा गावडे, हुवाप्पा अष्टेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बहाद्दरवाडी येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सीमाप्रश्न व या लढ्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. गावागावांमध्ये संघटना मजबूत करण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी शिवाजी पाटील, भावकाण्णा पाटील, शंकर पाटील, भुजंग पाटील, सुभाष पाटील, कल्लाप्पा पाटील, महादेव पाटील, सोमनाथ पाटील, शेखर पाटील आदी उपस्थित होते.









