अपोलो रुग्णालयात रात्रभर उपचार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना गुऊवारी संध्याकाळी येथील अपोलो ऊग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अडवाणी मुलगी प्रतिभा हिच्यासमवेत इस्पितळातून निवासाकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाकडून जारी करण्यात आली.
96 वषीय लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या आठवड्यातही उपचारासाठी नवी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. रात्रभर करण्यात आलेल्या उपचारानंतर गुरुवारी त्यांना एम्सच्या खासगी वॉर्डमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना फॉलोअपसाठी येण्याचा सल्ला दिला होता. आता पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्यामुळे इस्पितळात उपचार घ्यावे लागत आहेत. निवासस्थानीही त्यांच्या सेवेसाठी स्वतंत्र वैद्यकीय तज्ञांची सोय करण्यात आली आहे.









