वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय फुटबॉल संघातील आघाडी फळीत खेळणारा डेव्हिड लल्हलनसांगा बरोबर ईस्ट बंगाल संघाने नुकताच नवा करार केला आहे. आगामी आय लीग फुटबॉल हंगामात डेव्हिड ईस्ट बंगालचे प्रतिनिधीत्व करेल. ईस्ट बंगाल आणि डेव्हिड यांच्यात मंगळवारी 3 वर्षाच्या कालावधीसाठी हा नवा करार झाला आहे. ईस्ट बंगाल एफसी संघ हा सुपर चषक चॅम्पियन्स आहे. गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामात डेव्हिडने कोलकाता फुटबॉल लीग आणि ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत मोहमेडन स्पोर्टिंग क्लबकडून खेळताना सर्वाधिक गोल नोंदविले होते.









