प्रतिनिधी/ पणजी
राज्य विधानसभेच्या दि. 15 जुलैपासून प्रारंभ होणाऱ्या अधिवेशनाची अधिसूचना राज्यपालांकडून जारी करण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 174 (1) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी दि. 15 जुलै रोजी विधानसभा अधिवेशनाची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सकाळी 11.30 वा. पर्वरी विधानसभा सभागृहात हे अधिवेशन प्रारंभ होणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.









