वृत्तसंस्था/ पोर्टलँड (अमेरिका)
येथे झालेल्या पोर्टलँड ट्रॅक आणि फिल्ड अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू तसेच आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेता गुलवीर सिंगने पुरुषांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.
पुरुषांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत 26 वर्षीय गुलवीर सिंगने 13 मिनिटे 18.92 सेकंदाचा अवधी घेत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. 26 वर्षीय गुलवीर सिंगने या क्रीडा प्रकारात अविनाश साबळेने यापूर्वी नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.









