वृत्तसंस्था/ म्युनिच
येथे सुरु असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताची महिला नेमबाज ईशा सिंगने 25 मी. स्पोर्ट्स पिस्तुल नेमबाजीत पात्र फेरीमध्ये सहावे स्थान मिळविले असून तिचे पदकासाठीचे आव्हान जिवंत राहिले आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताची महिला नेमबाज रमिता जिंदालने सहावे स्थान मिळविले आहे. या नेमबाजी क्रीडा प्रकारातील अंतिम फेरी मंगळवारी होणार आहे.









