वृत्तसंस्था/ केप कैनावेरल
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांचा अंतराळप्रवास शनिवारी अंतिम क्षणात टळला आहे. बोइंगच्या पहिल्या अंतराळ उड्डाणाला तांत्रिक कारणांमुळे अंतिम क्षणात रोखण्यात आले आहे. सुनीता विलियम्स आणि नासामधील त्यांचे सहकारी बैरी बुच विल्मोर हे नासाच्या स्टारलायनर कॅप्सूलमधून उड्डाण करण्यासाठी सज्ज होते. परंतु तीन मिनिटे आणि 50 सेकंदांवर काउंटडाउन रोखले गेले.
लाँच कंट्रोलर डाटाचे मूल्यांकन करत अससल्याचे युनायटेड लाँच अलायन्सचे डिलन राइस यांनी सांगितले आहे. स्टारलायनरचे सोमवारी उड्डाण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. स्टारलायनर अंतराळयानाला अॅटलस 5 रॉकेटच्या मदतीने अंतराळात पाठविले जाणार आहे. यापूर्वी स्टारलायनरचे उड्डाण रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 6 मे रोजी प्रेक्षपणाच्या दोन तासांपूर्वी रोखण्यात आले होते. सुनीता विलियम्स यांनी यापूर्वी अंतराळप्रवास केला आहे.









