वृत्तसंस्था/ स्टेव्हेनजेर (नॉर्वे)
येथे सुरू असलेल्या नॉर्वे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत महिलांच्या विभागात सध्या 8.5 गुणांसह आघाडीवर असलेली भारताची ग्रँडमास्टर्स आर. वैशालीचा पाचव्या फेरीतील सामना चीनच्या ली शी होणार आहे. पहिल्या चार फेऱ्यामध्ये वैशालीने शानदार खेळ करत एकूण 8.5 गुणांची कमाई केली. नजिकच्या प्रतिस्पर्धांपेक्षा ती 2.5 गुणांनी आघाडीवर आहे.
161,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षिस रकमेच्या या स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर्स वैशालीने विश्वविजेती चीनची वेनजून जू आणि युक्रेनची म्युझच्युक यांना मागे टाकले आहे. या स्पर्धेत वैशालीने या पूर्वीच्या फेरीतील सामन्यात भारताच्या कोनेरू हंपी, अनुभवी क्रेमलिंग यांच्यावर शानदार विजय नोंदविले. चीनच्या जूने चार विजय नोंदविले आहेत. पेअरींग प्रकारातील पाचव्या फेरीत भारताचा आर प्रग्यानंद आणि अमेरिकेचा केरू सेना यांच्यात लढत होईल. प्रग्यानंदने म्हणजे 5.5 गुण मिळविले आहेत. नॉर्वेचा कार्लसन 6 गुण व फ्रान्सचा अॅलिरेझा 6.5 गुण तसेच अमेरिकेचा नाकामुराने 7 गुण नोंदविले आहेत.









