बंदोबस्त करण्याची मागणी
बेळगाव : न्यायालयाच्या आवारामध्ये कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वकिलांतून होत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून आहेत. त्यामध्ये या ठिकाणी कुत्र्यांचा वावर वाढला असून कचऱ्याची उचलही वेळेत करावी, अशी मागणी होत आहे. मागील महिन्याभरापासून शहरासह उपनगरांत कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. असे असताना न्यायालय आवारातही कुत्र्यांचा कळप दिसून येत आहे. ती कुत्री अचानकपणे हल्ला करण्याची शक्यता आहे. तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, असे वकील व पक्षकारांचे म्हणणे आहे. याकडे मनपा लक्ष देणार का? हे पहावे लागणार आहे.









