वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशांतर्गत शेअर बाजारात उतार-चढावानंतरही मंगळवारी एक मोठा विक्रम नोंद झाला. बीएसईत सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवलीकरण (एमकॅप) पहिल्यांदाच 5 ट्रिलियन डॉलर्सच्या (5 लाख कोटी रुपये) स्तराच्या पार पोहोचले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. हा आकडा देशाच्या वाढत्या आर्थिक शक्तीला दर्शविणारा आहे. बीएसईच्या उपलब्ध आकडेवारीनुसार मंगळवारच्या सत्राच्या अखेरीस सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 4,14,62,306.56 कोटी रुपये (4.97 लाख कोटी डॉलर्स) राहिले. हा याचा आतापर्यंतचा सर्वात उंच स्तर आहे. परंतु सत्रादरम्यान सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार मूल्यांकनाने 5 लाख कोटी डॉलर्सचा आकडा देखील पहिल्यांदाच पार केला.
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्यांकन 21 मे रोजी नव्या उंचीवर पोहोचले. याचबरोबर भारत अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर पाचवा मोठा बाजार भांडवलीकरण असणारा देश ठरला असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीमधील पदाधिकारी दीपक जसानी यांनी काढले आहेत.
मागील वर्षी 29 नोव्हेंबर रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्यांकन पहिल्यांदा 4 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचले होते. तर 3 लाख कोटी डॉलर्सचा टप्पा 24 मे 2024 रोजी बाजाराने गाठला होता. बाजार मूल्यांकन 10 जुलै 2017 रोजी पहिल्यांदा 2 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचले होते. तर 28 मे 2007 रोजी एक लाख कोटी डॉलर्सचा आकडा गाठला गेला होता.
शेअरबाजारात मागील काही महिन्यांपासून तेजीचे सत्र सुरू आहे. चालू वर्षात सेंसेक्सने 1713.05 अंक म्हणजेच 2.37 टक्क्यांचा वधार नोंदविला आहे. यादरम्यान सेंसेक्सने 75,124.28 अंकाचा आतापर्यंतचा उच्चांकी स्तर गाठला होता.









