वृत्तसंस्था/ जिनिव्हा
एटीपी टूरवरील जिनिव्हा खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा टॉप सिडेड टेनिसपटू सुमित नागलचे आव्हान एकेरीत पहिल्याच फेरीत समाप्त झाले. सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या सेबेस्टियन बाएझने सुमितचा पराभव करत विजयी सलामी दिली.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात सेबेस्टियन बाएझने सुमित नागलवर 7-6 (7-5), 6-3 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना जवळपास 2 तास चालला होता. पुढील आठवड्यात होणाऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सुमित नागलने प्रमुख ड्रॉसाठी आपली पात्रता यापूर्वीच सिद्ध केली आहे.









