मुंबई :
10 मे रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 2.56 अब्ज डॉलरने वाढला आहे. याप्रकारे विदेशी चलन साठा 644.15 अब्ज डॉलरवर राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यामध्ये देखील विदेशी चलन साठा 3.67 अब्ज डॉलरने वाढला होता. त्या आठवड्यात तो 641.59 अब्ज डॉलरवर राहिला होता. या आधीच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये सतत चलन साठ्यामध्ये घसरण अनुभवायला मिळाली होती.









