कोलकाता :
आर्थिक वर्ष 2025 करिता टाटा मोटर्स समूहामार्फत 43 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. नव्या उत्पादनांच्या सादरीकरणासोबतच नव्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सदरची गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये टाटा मोटर्स समूहाने 38 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. यामध्ये जग्वार लँड रोव्हरचा वाटा 30 हजार कोटी रुपयांचा होता. आर्थिक वर्ष 2025 मध्ये पाहता जग्वार लँड रोव्हर 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकते.









