वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पद्मश्री पुरस्कार प्राप्त लेखिका मालती जोशी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जोशी यांची कथा लिहिण्याच्या शैलीवर देशभरातील अनेक विद्यापीठांवर संशोधन झाले होते. मालती जोशी यांना 2018 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद याच्या हस्ते पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. मालती जोशी यांनी हिंदी आणि मराठी भाषेत 60 हून अधिक पुस्तकांचे लिखाण केले आहे.









