तीन आरोपींना अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आसाम पोलिसांनी कछार जिल्ह्यातील धोलाई आणि सिलचर येथून एकूण 1.2 किलो हेरॉईन जप्त केले आहे. आरोपींनी एकूण 100 साबणाच्या बॉक्समध्ये 7 कोटी रुपयांचे हेरॉईन लपवले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची अधिक चौकशी केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
1.69 कोटींचे सोने जप्त
केरळच्या कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी दुबईहून परतणाऱ्या प्रवाशाकडून 1.69 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. प्रवाशाने आपल्या जीन्सच्या पॅन्टमध्ये 20 सोन्याचे बार लपवले होते. त्याचे वजन 2,332.80 ग्रॅम आहे. याप्रकरणी कस्टम विभागाने अधिक चौकशी सुरू केली आहे.









