ज्या गावाचे नाव घेऊन संसदेत जायची संधी मिळाली त्या हातकणंगले गावांसाठी भरीव निधी देऊन शहराच्या पायाभूत विकासाला गती देण्याचे काम धैर्यशील माने यांनी केले आहे .रस्ते ,पिण्याचे पाणी, स्वराज्य भवन ,तालमींची दुरुस्ती यासाठी आठ कोटींचा निधी दिला आहे .या विकासकामांना पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोंदीचे आणि पर्यायाने धैर्यशील मानेंचे हात बळकट करा व त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सौ. वैदांतिका माने यांनी केले .
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. शहरांतील प्रमुख मार्गावरून निघालेल्या पदयात्रेला नागरिकाचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला . जागोजागी सौ. माने यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले . हलगीचा कडकडांट , फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता .
पदयात्रेत मा. जि.प. सदस्य अरुणराव इंगवले , माजी सरपंच अजितसिंह पाटील, माजी सरपंच सुदेश मोरे , अमरसिंह इंगवले, बाबुजमाल तालीम मंडळाचे अध्यक्ष सुभाष मोरे, छत्रपती शिवाजी महाराज तालीम मंडळाचे अध्यक्ष गुंडोपंत इरकर, मोती तालमीचे अध्यक्ष प्रकाश कोळी, माजी सरपंच प्रांजली पंडित निंबाळकर, नगरसेवक राजू इंगवले, नगरसेवक केतन कांबळे, नगरसेवक रणजीत धनगर, नगरसेवक अभिजीत लुगडे , नगरसेविका प्राजक्ता उपाध्ये, नगरसेविका सोनाबाई इरकर, नगरसेवक विजय खोत, नगरसेविका अलका जयसिंग कांबळे, नगरसेवक दिनानाथ मोरे, नगरसेविका अरुंधती उमेश सूर्यवंशी, नगरसेवक रमजान मुजावर , नगरसेवक प्रकाश कांबळे , आण्णासो चौगुले , रावसाहेब चौगुले, सुधीर पोतदार , राजू केरबा पाटील, शिवसेना शहरप्रमुख मिथुन जाधव, महेश जाधव , प्रवीण कोळी, शिवसेना युवा शहराध्यक्ष राकेश माळी , सौ. स्नेहल जाधव यांच्यासह बाबूजमाल , मोती आणि शिवाजी तालमीचे कार्यकर्ते , महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .