वृत्तसंस्था/ नासायु (बहामास)
येथे रविवारी झालेल्या विश्व अॅथलेटिक्स रिले स्पर्धेतील शेवटच्या पात्र फेरीमध्ये भारतीय धावपटूंकडून साफ निराशा झाली. 4×400 मी. पुरूषांच्या सांघिक रिलेमध्ये प्राथमिक टप्प्यात भारतीय संघातील धावपटू राजेश रमेशने माघार घेतली. पायामध्ये अचानक गोळे आल्याने त्याने ही रेस अर्धवट सोडली.
पुरूषांच्या 4×400 सांघिक रिलेमध्ये मोहम्मद अनास याहिया, राजेश रमेश, मोहम्मद अजमल आणि अमोल जेकॉब यांचा समावेश होता. भारतीय धावपटू पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविण्यासाठी उत्सुक होते. हिटमध्ये भारतीय स्पर्धकांना चांगली कामगिरी करता आली नाही. राजेश रमेशने ही शर्यत अर्धवट सोडल्याने भारतीय रिले संघाची निराशा झाली. महिलांच्या 4×400 मी. रिले तसेच मिश्र 4×400 मी. रिलेमध्ये पहिल्या दिवशी भारतीय धावपटूंना चांगली कामगिरी करता आली नाही.









